Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील आमटी-भाकरी भंडार्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासाफाटा : नेवासा येथील भगवान विश्‍वकर्मा मंदिरात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या बुधवारी 4 डिसेंबर रोजी आयोजित आमटी भाकरी (भंडारा) कार्यक्रमाला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आमदार रोहित पवारांचे कौतुक… म्हणाले, भगवा ध्वज सामर्थ्य, बलिदानाचे प्रतीक
संस्काराशी निगडित रांगोळी हे पवित्रतेचे प्रतीक ः अपर जिल्हाधिकारी कोळेकर
नव्या सरकारमध्ये नगरमधून कोणाला मंत्रीपदाची लॉटरी?

नेवासाफाटा : नेवासा येथील भगवान विश्‍वकर्मा मंदिरात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या बुधवारी 4 डिसेंबर रोजी आयोजित आमटी भाकरी (भंडारा) कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या निमित्ताने खादी ग्रामोद्योगचे चेअरमन बाबासाहेब मोरे व अनुराधा मोरे यांच्या हस्ते भगवान विश्‍वकर्मा यांच्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली.
यावेळी झालेल्या भंडारा कार्यक्रम प्रसंगी आमटी भाकरी प्रसादाचे अन्नदाते बाबासाहेब मोरे यांचा मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक इंजिनियर सुनीलराव वाघ, जेष्ठ व्यापारी विजय गांधी, विठ्ठलराव साळुंके यांच्या हस्ते व मंदिर सेवेकरी बबन राजे, मच्छिंद्र गव्हाणे केशव कोबरणे, संतोष शेंडगे, ज्ञानेश्‍वर वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य नेवासा गावचे युवा पुरोहित वेदशास्त्रसंपन्न आचार्य निखिल गुरू जोशी यांनी यांनी केले. तर भगवान विश्‍वकर्मा मंदिराचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी बोलताना इंजिनियर सुनीलराव वाघ म्हणाले की, गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज व हभप महंत श्री उध्दवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भगवान विश्‍वकर्मा मंदिराची निर्मिती झाल्यापासून येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या येणार्‍या बुधवारी आमटी भाकरी उपक्रम सुरू केला आहे. तीर्थक्षेत्र नेवासे नगरीच्या वैभवात भर घालणारे भगवान विश्‍वकर्माचे हे मंदिर सर्व धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे, भंडारा उपक्रमासाठी अन्नदान करू इच्छिणार्‍या अन्नदात्यांनी पुढे यावे अन्नदानासाठी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी झालेल्या भंडारा कार्यक्रम प्रसंगी भगवान विश्‍वकर्मा मंदिराचे सेवेकरी, बांधकाम कामगार, पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराचे प्रमुख इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.

COMMENTS