Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडकी बहिण योजनेसाठी पोस्ट पेमेंट बँक खाते उघडण्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर : राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांसाठी पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्याच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अहमदन

सहायक पोलिस निरीक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
आमदार संग्राम जगतापांना झोपेतही माझा चेहरा दिसतो… किरण काळेंचा घणाघात
ललिता सातव यांच्या हस्ते ध्वजारोहण

अहिल्यानगर : राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांसाठी पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्याच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अहमदनगर विभागातील पोस्ट पेमेंट बँक शाखांद्वारे सहा महिन्यांत तब्बल 1 लाख 29 हजार 444 महिलांनी नवीन खाती उघडली आहेत. यामुळे महिलांना बँकिंग सुविधांसोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी महिलांना फक्त आधारकार्ड आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता खाते उघडण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये महिलांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. गत सहा महिन्यांत पोस्ट खात्यांद्वारे 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली असून, बँकिंग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासून पोस्ट कार्यालयांनी महिलांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. खातेदार महिलांसाठी वेगवेगळ्या सवलती आणि सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पोस्ट पेमेंट बँक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अहमदनगर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक बी. नंदा यांनी सांगितले.

COMMENTS