आमदारांच्या चालकांसाठी विशेष कार्यशाळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारांच्या चालकांसाठी विशेष कार्यशाळा

विनायक मेटेंच्या अपघाती मृ्त्यूनंतर परिवहन विभाग सावध

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. पुणे ते मुंबई महामार्गावर कार अपघात झाला. गाडी चालविताना कारचालक सावध असले पाह

चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन रहिवासी जखमी .
बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली.
राजधानी दिल्लीत भीषण अपघात

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. पुणे ते मुंबई महामार्गावर कार अपघात झाला. गाडी चालविताना कारचालक सावध असले पाहिजे. तर अपघात टाळता येऊ शकतात. या अनुषंगाने विधिमंडळातील सर्व सदस्यांच्या चालकांसाठी परिवहन विभागानं काल एक कार्यशाळा घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. विधानसभेचे 288 आणि विधान परिषदेचे 78 आमदार यांचे चालक या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, 150 वाहन चालक या प्रशिक्षणात उपस्थित होते. ही कार्यशाळा घेऊन परिवहन विभाग आता सावध झाल्याचं दिसून आलं. परिवहन कार्यालयाच्या रस्ते सुरक्षा विभागातर्फे हे प्रशिक्षण घेण्यात आले. आमदारांच्या चालकांनी आपातकालीन परिस्थितीत काय काय निर्णय घ्यावे असा कार्यशाळेचा विषय होता. या कार्यशाळेत चालकाने प्रथमोपचार कसे घ्यावे. वैद्यकीय मदत हवी असल्यास काय करावे. यासंदर्भात मार्गदर्शक लघुपट दाखविण्यात आला. अपघात प्रसंगी कोणते निर्णय घ्यावे, यावर पुण्याची एनजीओ परिसरचे स्वयंसेवक आणि फोर्टीसचे डॉ. मनजित सिंह अरोरा यांच्या चमूनं मार्गदर्शन केलं. ताडदेव आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी चालकानं काय करावे आणि काय टाळावे, यावर मार्गदर्शन केलं. मानव धावताना जास्तीत जास्त 15 ते 20 किलोमीटर वेगाने जाऊ शकतो. पण, वाहनातून प्रवास करताना वेग चार-पाच पट जास्त असतो. मानवी मर्यादांचे भान ठेवणे आवश्यक आहे. वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये पुरेसे अंतर असावे. वाहन चालविताना अधिक सतर्क असले पाहिजे. वाहन चालविताना कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष नको. पुरेशी झोप झालीच पाहिजे, असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष परिवहन आयुक्त अविनाथ ढाकणे यांनी केले.

COMMENTS