Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजू सोनवणे यांना विशेष सेवा पदक जाहीर

मिरजगाव प्रतिनिधी - नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजू संभाजी सोनवणे यांनी नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय क

राहत्यात मविआकडून जोडे मोरो आंदोलन
बारा बलुतेदारांना बाजारपेठेत जागा द्यावी : राहुल गांधी यांच्याकडे नंदकुमार कुंभार यांची मागणी
उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा श्रीगणेश उत्सवात गौरव

मिरजगाव प्रतिनिधी – नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजू संभाजी सोनवणे यांनी नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांची राज्य सरकारच्या गृह विभागाकडून विशेष सेवा पदकासाठी निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने गडचिरोली चंद्रपूर व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात राजु सोनवणे यांचा समावेश होता. या पथकाने दिलेले कार्य यशस्वी पणे पार पाडले, यामध्ये पोलीस निरीक्षक राजु संभाजी सोनवणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली याबद्दल त्यांना राज्य सरकारच्या गृह विभागाकडुन विषेश सेवा पदक जाहीर केले आहे. ते कर्जत तालुक्यातील  थेरवडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण थेरवाडी येथे झाले. पुढील शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेज कर्जत, बीएस्सी पुणे येथे झाले. शेतकरी कुटुंबातील असुन देखील गरीब परिस्थितीतुन शिक्षण घेत घेऊन महाराष्ट्र लोकसेवा घेतलेल्या मार्फत सन 1996 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. महाराष्ट्र पोलीस अकॅडमि नाशिक येथे 11 महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यावर मुंबई मध्ये नेमणूक झाली. मुंबई मध्ये पोलीस ठाणेस गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून काम -अनेक मालमत्तेच्या क्लिष्ट गुन्हांची उकल केली . तसेच आर्थिक गुन्हे विभाग मुंबई येथे काम केले व अनेक क्लिष्ट आणि हाय प्रोफाईल गुन्हांचा उत्कृष्ठ तपास केला. सन 2013 ते 2016 दरम्यान गोंदिया या नक्षल ग्रस्त भागात कर्तव्य केले . तेथे पोलीस उप अधीक्षक गृह विभागाचा अतिरिक कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळून अनेक नक्षल ग्रस्त भागातील पोलीस आस्थापने च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूलभूत सुविधा उभारणी मध्ये कार्य . तसेच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे ठाणेदार (पोलीस स्टेशन प्रभारी ) म्हणून काम केले व 10 गावात गावकर्‍यांचे मदतीने यशस्वी दारूबंदी केली व नक्षल कारवायांना आळा घातला. या सर्व कामाची दखल घेऊन त्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली. त्यांचे कर्जत तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS