Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएमपीची खास योजना

अवघ्या 500 रुपयांत पहा पुण्याजवळील स्थळे

पुणे : पीएमपीच्या पुणे स्थानक-रांजणगाव या पर्यटन बससेवेला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 24 पर्यटकांनी सफर केली. या सेवेसाठी प्रतिप्रवा

मुंबई बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि बसचा अपघात
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची : पालकमंत्री दादाजी भुसे
म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24

पुणे : पीएमपीच्या पुणे स्थानक-रांजणगाव या पर्यटन बससेवेला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 24 पर्यटकांनी सफर केली. या सेवेसाठी प्रतिप्रवासी पाचशे रुपये एवढा दर असून, प्रत्येक शनिवार आणि रविवार, तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी ही सेवा सुरू राहणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी पीएमपीने सात मार्ग निश्‍चित केले आहेत. या मार्गांवर वातानुकुलित गाडीद्वारे प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सेवा दिली जात आहे. पुणे रेल्वे स्थानक, वाघेश्‍वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजीमहाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती असा या पर्यटन सेवेचा मार्ग आहे. पुणे रेल्वेस्थानक येथून सकाळी नऊला बस सुटणार असून, पुणे स्थानक येथे सायंकाळी साडेपाचला पोहोचणार आहे. या पर्यटन सेवेसाठी डेक्कन जिमखाना, पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, महापालिका भवन या पीएमपीच्या पास केंद्रांवर बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, या पर्यटन सेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS