Homeताज्या बातम्यामनोरंजन

साऊथ स्टार कीर्ती सुरेश लवकरच अडकणार लग्नबंधनात ?

साऊथ स्टार कीर्ती सुरेश सध्या चांगलीच चर्चेत आहे. किर्ती नुकतीच ‘दसरा’ चित्रपटात दिसली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाबातच्या चर्चां

रेनबो स्कूलचा विद्यार्थी साईश गोंदकर याची सातासमुद्रापार भरारी
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा
पाच राज्यांमध्ये 1760 कोटी रुपये जप्त

साऊथ स्टार कीर्ती सुरेश सध्या चांगलीच चर्चेत आहे. किर्ती नुकतीच ‘दसरा’ चित्रपटात दिसली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाबातच्या चर्चांनी जोर धरला आहे. किर्ती दुबईतील एका व्यावसायिकासोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. आता या सगळ्यावर कीर्ती सुरेशने मौन सोडले आहे. कीर्ती सुरेशचा फरहान नावाच्या व्यक्तीबरोबरचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. कीर्ती फरहानबरोबर रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता खुद्द किर्तीने ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. किर्तीने ट्वीटमध्ये लिहिलं आहे, हाहाहा !! या वेळी माझा खास मित्राला या सगळ्यात ओढायच नव्हतं! जेव्हा मला वाटेल तेव्हा मी त्या ‘मिस्ट्री मॅनला’ सर्वांसमोर आणेन. तोपर्यंत शांत रहा.”. किर्तीच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

COMMENTS