Homeताज्या बातम्यासंपादकीय

सोरेन’च्या निष्ठा !

गेल्या एक दशकात राजकारणाची साधनसुचिता हरवल्याचं वातावरण, चहूबाजूला दिसतंय. देशातील प्रत्येक राजकीय पक्षातील भ्रष्टाचारात नाव लिप्त असणाऱ्या नेत्य

आरोग्याच्या परिक्षा खासगी संस्थांमार्फत का?
काॅंग्रेसचा जातनिहाय जनगणनेचा अजेंडा आणि…. 
रहबर ते रेडिओ ! 

गेल्या एक दशकात राजकारणाची साधनसुचिता हरवल्याचं वातावरण, चहूबाजूला दिसतंय. देशातील प्रत्येक राजकीय पक्षातील भ्रष्टाचारात नाव लिप्त असणाऱ्या नेत्यांची विश्रांती भारतीय जनता पक्षात जशी झाली, तसे, ते त्या त्या राज्यातील सत्ताधारी ही बनले. भारतीय राजकारणातील वैचारिक विवेक हरवल्याचं हे लक्षण आहे. सध्या या वर्षाखेरीस चार राज्यांमध्ये निवडणुका होतील. त्यातील दोन राज्यांच्या जाहीर झाल्या आणि दोनच्या अजून व्हायच्या बाकी आहेत. जाहीर झालेली राज्य हरियाणा आणि जम्मू काश्मीर ही असल्याचे आपण जाणतातच. पण; जाहीर न झालेली राज्य, त्यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंड चा समावेश होतो. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावून, त्यांना अनेक महिने तुरुंगात डांबले. न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला आणि ते बाहेर आले. पण, त्यांचा उत्तराधिकारी म्हणून झारखंड ची राजकीय सत्ता सांभाळणारे आणि मुख्यमंत्रीपद भूषवलेले चंप‌ई सोरेन यांना हेमंत सोरेन हे तुरुंगा बाहेर आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा म्हणजे त्यांची नाराजी आहे; असा एक तर्क भारतीय जनता पक्षाच्या दोन्हीं नेत्यांना वाटला आणि त्यांनी चंपई सोरेन यांच्याशी संपर्क मोहीम वाढवली. असं म्हणतात की, ‘माशाला खायचं असेल तर माशाला काही  खाऊ घालावं लागतं’. एखाद्याला त्याच्या मूळ पक्षापासून तोडायचं असेल तर त्याला आमिषे देऊन कसं घ्यायचं, हे भाजपाने सप्रमाण सिद्ध केलं आहे. झारखंड हे राज्यच मुळात झारखंड मुक्ती मोर्चा या आंदोलन कम राजकीय पक्षाच्या माध्यमातून  निर्मिती झाली. आदिवासी अस्मिता घेऊन शिबू सोरेन यांनी झारखंड हे स्वतंत्र आदिवासी राज्य निर्माण करण्याचं आंदोलन चालवलं.

अखेर त्या आंदोलनाला यश मिळालं आणि झारखंड राज्याची स्थापना झाली. शिबू सोरेन यांच्या सोबतही चंप‌ई सोरेन यांनी काही काळ काम केलं होतं. परंतु, त्यांचा झारखंड मुक्ती मोर्चा बरोबर चा इतिहास हा सुरुवातीपासून चा नाही. १९९१ मध्ये चंपई सोरेन  अपक्ष निवडणूक लढले होते आणि निवडून आले होते.  त्यानंतरच्या म्हणजे २००० च्या निवडणुकीत त्यांचा पराभव होत गेला आणि २००५ पासून ते पुन्हा विधानसभेत दाखल झाले. सभागृहातील ज्येष्ठ नेते असणारे चंप‌ई सोरेन  यांच्यावर विश्वास ठेवून हेमंत सोरेन तुरुंगवासात गेले. पण, जसे ही त्यांना जामीन मिळाला, त्यानंतर जामीनावर बाहेर आलेले हेमंत सोरेन यांनी पुन्हा झारखंड चा मुख्यमंत्री होण्यास प्राधान्य दिले आणि हीच बाब केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी हुडकून काढली.  झारखंडमध्ये मिशन लोटस यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात‌, झारखंडमध्ये जे सहा आमदार चंपई सोरेंनसह बाहेर पडले आहेत, त्यांनी आपल्या मूळ पक्षाच्या वैचारिकतेशीच गद्दारी केल्याचे भावना आता झारखंडच्या आदिवासी समूहात व्यक्त होत आहे. चंप‌ई सोरेन यांच्यावर ज्या पद्धतीने झारखंडच्या लोकांनी विश्वास टाकला, ज्या विश्वासाहर्तेने त्यांनी हेमंत सोरेन यांचे उत्तराधिकारी म्हणून ५ महिने सत्ता सांभाळली; त्याचा परिणाम त्यांच्या निष्ठा अधिक बलवान होण्यातच दिसतील, असे मानले जात होते. परंतु मुख्यमंत्रीपद सोडल्याबरोबरच त्यांनी भाजपकडे धरलेली वाट ही त्यांच्या आजपर्यंतच्या निष्ठांना त्यांनीच दिलेली तिलांजली आहे. त्यांचा या पुढील राजकारणात आता गांभीर्याने विचार होणार नाही. एखाद्या राजकीय पक्षातून बाहेर पडणारे नेते, आपल्या मूळ पक्षाला सोडत असले तरी, ते ज्या पक्षात प्रवेश घेतात, त्या पक्षात त्यांचा मानसन्मान कसा वाढू शकतो, ही मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे

COMMENTS