Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लवकरच राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांचे 142 महिलांच्या हाती स्टेअरिंग

कोल्हापूर / प्रतिनिधी : एसटी महामंडळाच्या सेवेत येण्यासाठी इच्छुक असलेल्या दीड हजार महिला उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सेवेत घेण्याच्या प्रक्रिय

म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु
युवा नेते प्रतीक पाटील यांच्या लग्नाची जय्यत तयारी
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

कोल्हापूर / प्रतिनिधी : एसटी महामंडळाच्या सेवेत येण्यासाठी इच्छुक असलेल्या दीड हजार महिला उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सेवेत घेण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. त्यानुसार राज्यभरात नव्याने 142 महिलांना एसटी महामंडळात ‘चालक तथा वाहक’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 50 आसन क्षमतेच्या अवजड बसेस महिला चालविणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू झाले असून येत्या दोन महिन्यांत या महिला चालकांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे. यात कोल्हापुरातील दोन महिलांचा समावेश असून एका महिलेचे प्रशिक्षण सुरू आहे.
एसटी महामंडळात राज्यभरात जवळपास 70 हजार चालक वाहक प्रवासी सेवा देतात. 18 हजार गाड्यातून दिवसाकाठी 70 लाख प्रवासी वाहतूक होते. अपुर्‍या गाड्या, अपुर्‍या मनुष्यबळामुळे एसटीला सक्षम सेवा देताना कसरत होत आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळाने सन 2019 अंतर्गत चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रिया केली होती. यातील पात्र उमेदवारांपैकी 27 पुरुष उमदेवारांना नियुक्ती पत्र दिले. तसेच 22 महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे भरती प्रक्रियेतील पात्र महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाने चालक तथा वाहक पद भरतीसाठी महिलांकडून अर्ज मागवले होते. यात 203 महिला उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यातील 142 महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचे परवानेही सादर केले. यातील 22 महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. एकूण 80 दिवसांचे सेवा पूर्व प्रशिक्षण होणार असून प्रशिक्षणपूर्ण होताच महिला चालक तथा वाहक म्हणून प्रत्यक्ष कामगिरी बजावणार आहेत. यात कोल्हापूरच्या दोन महिला एसटी चालक म्हणून राज्य परिवहन विभागात काम करणार आहेत.

COMMENTS