Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर नेकनुर स्त्री रूग्णालयात सोनोग्राफीला सुरूवात

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील नेकनुर येथील स्त्री व कुटीर रूग्णालय बालाघाटावरील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरोग्य सुविधेचं वरदान असुन य

कोतुळेश्‍वरमध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुण्यातही तुटवडा
पिंपळदरी आश्रम शाळेला सोलर वॉटर प्युरिफायर भेट

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील नेकनुर येथील स्त्री व कुटीर रूग्णालय बालाघाटावरील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरोग्य सुविधेचं वरदान असुन याठिकाणी 60 बेडचे स्त्री रूग्णालय आहे. अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील नेकनुर मोठी बाजारपेठ असल्याने बालाघाटा वरील 35-40 गावातील ग्रामस्थांना या रूग्णालयाचाच आधार असुन गेल्या कित्येक महिन्यांपासून याठिकाणची सोनोग्राफी मशीन व सोनोग्राफी तज्ञ नसल्याने याठिकाणच्या रूग्णांना सोनोग्राफीसाठी बीडला जावे लागत असे.सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.31 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन सोनोग्राफी मशीन व सोनोग्राफी तज्ञाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना निवेदन देण्यात आले होते.त्यानंतर आंदोलनाची दखल घेत डॉ.सुरेश साबळे यांनी सोनोग्राफी मशीन व सोनोग्राफी तज्ञाची नेमणूक केली असुन गोरगरीबांना यांचा फायदा होणार आहे. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि.27 जुलै रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने स्त्री रूग्णालय नेकनुर येथे सोनोग्राफी सेवा सुरू करण्यासाठी डॉ.सुमित मसुरे वैद्यकीय अधिकारी वर्ग -2 (स्त्रीरोग तज्ञ) नेकनुर यांना परवानगी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना पत्रव्यवहार केला होता. त्यापत्राची दखल घेत डॉ.सुरेश साबळे यांच्या परवानगीने दि.3 ऑगस्ट पासून दर गुरुवारी रुग्णालयात सोनोग्राफी तपासणी सुरू केली असुन रुग्णांना बीडला जाण्याची आवश्यकता नाही. डॉ.शिंदे, डॉ.घुगे, आणि डॉ.मसुरे टीममुळे सोनोग्राफीसाठी रूग्णांना बीडला जाण्याचा  आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.

COMMENTS