सो नवी दिल्ली: कोरोना प्रादुर्भावामुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचाररत असलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रकृती चिंताजनक असल्
सो
नवी दिल्ली: कोरोना प्रादुर्भावामुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचाररत असलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आलीय. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमित असलेल्या सोनियांच्या नाकातून रक्त वाहू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री यजराम रमेश यांनी दिली.
जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गानंतर 12 जून रोजी सोनिया गांधी यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांना गुरुवारी श्वास घेण्यास त्रास होत होता. नंतर त्यांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. अशी माहिती जयराम यांनी दिली. तसेच, कोरोनानंतर त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आणखी काही समस्या उद्भवल्या आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. असे जयराम यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली होती. त्यांना काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
COMMENTS