Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना प्रदान

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील 13 क

थकबाकी वसुलीसाठी बंद करणार सांडपाणी मार्ग ; मुंबई महापालिकेचा अनोखा उपाय; मालमत्ताधारक रडारवर
रत्नागिरी हापूस पुण्याच्या मार्केटमध्ये दाखल
कोविडचा धोका कमी झाल्यावर राज्यातील यात्रा, जत्रांना परवानगी : अमित देशमुख

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना,  प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2024 आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 शिवाजी साटम,  चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023 आशा पारेख यांना तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2023 एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आले.

COMMENTS