Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतूनच : शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट

परभणी :परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत असतांना मृत्यू झाला आहे. त्याचे शवविच्छेदन सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे करण्य

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनील प्रभू यांची उलट-तपासणी
शिंदे गटातील 7 खासदार ठाकरेंच्या संपर्कात
सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी

परभणी :परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत असतांना मृत्यू झाला आहे. त्याचे शवविच्छेदन सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले असून, त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण शॉक फॉलिंग मल्टीपल इन्ज्युरीमुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती. पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरमध्ये पाठवला होता. याठिकाणीही शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले. यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम ऑन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.

न्यायासाठी लढा उभारणार :अ‍ॅड. आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परभणीला भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासह त्यांच्या न्यायासाठी लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्थानिक गेस्ट हाऊसमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. त्यात त्यांना पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीची माहिती देण्यात आली. त्याचे अनेक व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले.

धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा : सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला. पोलिस निरीक्षक शरद मरे, पोलिस उपनिरीक्षक तुरनर, स्थानिक गुन्हे शाखेचे गोरगांड या तीन अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करुन स्वतंत्र चौकशी करावी. तसे केले नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन बसावे लागेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला होता.

COMMENTS