मुलाच्या पार्टनरशिपच्या प्रश्‍नावर सोमय्यांची बोबडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलाच्या पार्टनरशिपच्या प्रश्‍नावर सोमय्यांची बोबडी

अलीबागच्या 19 बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी का भरला?

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पीएमसी घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर सोमय्या यांचे राकेश वाधवानशी थेट संबंध

अकरावीचे प्रवेश होणार दहावीच्या गुणांवरच; मुंबई उच्च न्यायालयाने केली सीईटी रद्द
आमदार अपात्रता निकालाबाबत नार्वेकरांना सर्वोच्च नोटीस
केरळमधून सोलापुरात स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा खून


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पीएमसी घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर सोमय्या यांचे राकेश वाधवानशी थेट संबंध असल्याचा आरोप सोमय्या राऊत यांनी केला. राऊत यांनी काल आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांना आज पत्रकारांनी सोमय्या यांना विचारले की, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या या प्रश्‍नावर सोमय्यांची बोबडी वळली होती. त्यांनी पुन्हा तत पप केल्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी तोच प्रश्‍न विचारला.
यावेळी सोमय्या यांनी ही गोष्ट सावरुन नेत पीएमसी बँकेतील घोटाळ्याशी आमचा दमडीचा संबंध नाही असे सांगितले. सोमय्या म्हणाले की, आम्ही त्या बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. कोकणातील अलिबाग येथील 19 बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंच्या नावे भरण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरट सोमय्या यांनी दिली. शिवसेनेचे संजय राऊत यांनी मंगळवारी सोमय्या पिता-पुत्रांवर आरोप केले होते. त्यानंतर सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राऊत यांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी मंगळवारी किरीट सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे अलिबागमधील 19 बंगल्याचे कनेक्शन सोमय्यांनी बाहेर काढले होते. यासंबंधी त्यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भरलेल्या मालमत्तेच्या पावत्या सादर केल्या.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले दाखवण्याचं आव्हान दिले होते. तसेच बंगले न सापडल्यास जोड्याने मारणार असल्याची भाषा केली. यावर किरीट सोमय्यांनी थेट पायातील चप्पल काढून दाखवली. आणि मी केलेले दावे खोटे ठरवल्यास माझ्याच चप्पलीने मारा,असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी सोमय्या म्हणाले की, अलिबागचे बंगले ठाकरेंशी संबंधित नव्हते तर, मालमत्ता कर का भरला, असा प्रश्‍न सोमय्यांनी उपस्थित केला. रश्मी ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित माहिती समोर आणली आहे. संबंधित बंगले असणार्‍या ग्रामपंचायतींची रश्मी ठाकरेंनी माफी मागितल्याचे सोमय्यांनी सांगितले. अन्वय नाईकने 2008 मध्ये बंगले बांधले. त्यानंतर 2009 पासून 19 बंगल्यांचा कर हा रश्मी ठाकरे आणि वायकर यांनी भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनीषा रविंद्र वायकर यांनी जागा कधी घेतली ? गेल्या वर्षीपर्यंत ते कर भरत होते. जर बंगले त्यांच्या नावावर नाहीत तर मग कर का भरला ? असे प्रश्‍न सोमय्या यांनी उपस्थित केले. रश्मी ठाकरे यांनी 19 बंगल्यांचा मालमत्ता कर ग्रामपंचायतीत भरलाय. इतकंच नाही तर रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्याआधीचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकच्या नावाने, त्यानंतर रश्मी ठाकरेंनी भरलाय असे सोमय्या यांनी सांगितले.

COMMENTS