Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘वंचित’च्या वतीने आयोजित सोलो डान्स स्पर्धा उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः विश्‍वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती कोपरगाव शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वती

महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज – चंद्रभान अग्रवाल
सूरत-हैदराबाद महामार्गबाधितांनाजास्तीत जास्त मोबदला मिळावा : मंत्री थोरात करणार पाठपुरावा
हिंदू दलितांच्या लोकसंख्यानिहाय आरक्षणाकरीता लढा उभारणार – आ.नरेंद्र भोंडेकर

कोपरगाव प्रतिनिधी ः विश्‍वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती कोपरगाव शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली त्याच अनुषंगाने रविवार 23 एप्रिल रोजी शहरातील सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सोलो डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  यात तालुक्यातील अनेक लहान मोठ्या ला मुलींनी सहभाग घेऊन आपला नृत्यविष्कार सादर केला.
वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित चे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा संघटक अनिल बनसोडे, चरण त्रिभुवन, संतोष त्रिभुवन, कोपरगाव शहर  शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सनी वाघ, माजी शहर प्रमुख भरत मोरे, असलम शेख, डॉ. शिवाजी रोकडे, विनोद ठक्कर, प्रफुल्ल शिंगाडे,ऍड. शीतल देशमुख, अ‍ॅड. करुणा सोनवणे, शकील तांबोळी, नितीन बनसोडे, चंद्रकांत खरात राजेंद्र मोकळ,संजय त्रिभुवन, पवन पंजाबी,विजय कसलीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीते साठी करिष्मा निकम,सुनिता पाटोळे, पाटील, रजनी लासे, सुनिता मुंतोडे, सविता वाघ, ज्योती खरात, शारदा जाधव,शीतल गोडगे, सुनीता जगताप, पै.साईनाथ जाधव, वैभव राजगुरू, आकाश खरात, आदित्य, करण देवरे भालेराव, सुरेश त्रिभुवन, सिद्धेश खरात, चैतन्य खरात, भिमराज बनसोडे, आदित्य गोडगे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी नृत्याविष्कार सादर करणार्‍या मुला मुलींना लावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर रचलेली गीते छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडे विविध महापुरुषांवरती असलेले गीते यावर नृत्याविष्कार करत इतिहास उजळून काढला तर वंचित बहुजन आघाडीचे वतीने ट्रॉफी व बक्षीस म्हणून भरीव रक्कम व सन्मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत शिरसाठ यांनी केले तर आभार अनिल बनसोडे यांनी मानले.

COMMENTS