Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दानवलेवाडी येथे सुट्टीवर आलेल्या जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील दानवलेवाडी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टीवर आलेल्या जवानाचा सिंगलफेज मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्

प्रवेशादरम्यान शैक्षणिक शुल्कासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई : मोहन गायकवाड
जावलीचे जवान प्रथमेश पवार यांना विरमरण
विकास आघाडीतर्फे 11 कोटी निधीला विरोध करणार्‍या नगरसेवकांच्या दारात ढोल-ताशांचा गजर

दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील दानवलेवाडी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टीवर आलेल्या जवानाचा सिंगलफेज मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रशांत दिलीप कदम (वय 35) असे मृत जवानाचे नाव असून, सध्या ते फुलबारी आसाम याठिकाणी सैन्यदलात सेवेत होते.
माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील जवान प्रशांत कदम हे 14 वर्षांपासून भारतीय सैन्य दलात सेवेत होते. ते सध्या 19 मराठा एन्फंट्री फुलबारी आसाम येथे हवालदार या पदावर सेवा बजावत होते. गावची यात्रा व कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रशांत कदम हे दि. 24 मार्च रोजी दानवलेवाडी येथे आले होते. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पाणी भरण्यासाठी त्यांनी मोटार सुरु केली. काही वेळाने पाण्याची पाईप निघाल्याने ते पाईप बसवण्यासाठी मोटारीजवळ गेले. यावेळी कदम यांना मोटारीतून लिक झालेल्या विजेचा धक्का बसल्याने ते खाली पडले. पुढील उपचारासाठी त्यांना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
जवान प्रशांत कदम यांच्यावर सायंकाळी उशिरा दानवलेवाडी याठिकाणी जिल्हा सैनिक कार्यालयातील अधिकारी, बेळगाव येथील मराठा एन्फंट्री सैन्य दलातील अधिकारी, माणच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, सरपंच शारदा माने यांच्या उपस्थितीत अंत्य संस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही कदम कुटुंबियांचे सांत्वन केले. जवान प्रशांत कदम यांच्या पश्‍चात पत्नी सुप्रिया, मुलगा श्‍लोक, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. जवान प्रशांत कदम हे 1 मे रोजी सुट्टी संपवून पुन्हा सेवेसाठी जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दानवलेवाडीसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS