Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजूरच्या सर्वोदय विद्यालयात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

अकोले ः अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेचे गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयत  प्राचार्य बादशाह ताज

नव्याने दिलेले कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पाथर्डीत उपोषण
ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात
विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत

अकोले ः अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेचे गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयत  प्राचार्य बादशाह ताजणे यांच्या पुढाकाराने व सत्यनिकेतन संस्थेचे सचिव एम.एल.मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर विद्यालयात अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
सदर प्रकल्प शिवांश सोलसचे सुशांत नामदेव वाकचौरे यांचे मार्फत तिन किलोवॅट प्रकल्प सुरू करण्यात आला.या प्रकल्पात सुशांत यांनी स्वखर्चाने आपल्या वडीलां च्या प्रतिआदर व्यक्त करण्यासाठी दोन किलोवॅट प्रकल्प विद्यालयास देणगी स्वरूपात दिला आहे.विद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.नामदेव वाकचौरे यांनी सत्यनिकेतन संस्थेत विविध विभागात विशेषत:शेती,वस्तीगृह,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवाभावी वृत्तीने गुरुवर्य पाटणकर साहेबांबरोबर ज्ञानदानाचे कार्य पार पाडले आहे.त्यांचे चिरंजीव सुशांत हेही याच विदयालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेतून विदयालयाची गरज लक्षात घेऊन त्यांनी दोन किलोवॅट ऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात दिला असल्याने त्याची वाढीव किंमत एक लाख विस हजार रूपये आहे.याबद्दल प्राचार्य बादशहा ताजणे यांनी सुशांत तसेच वडील एन.आर.वाकचौरे यांचा सहपत्नीक सत्कार केला. सदर प्रकल्पाचे उद्घाटन प्रा. सचिन लगड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बादशाह ताजने,उपप्राचार्य दीपक बुर्‍हाडे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांसह दिगंबर पवार, शिवांश सोलर प्रकल्पाचे प्रो. पा. सुशांत वाकचौरे उपस्थित होते.या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यालयामध्ये अपारंपारिक ऊर्जा स्रोत निर्माण करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीच्या बचतीबरोबरच विद्यालयाची कायमस्वरूपी विजेची गरज भागली .वाढीव दोन किलो वॅट प्रकल्पामुळे आगाऊ पाच वर्षे विजेची गरज भागणार आहे. या प्रकल्पातून दिवसाकाठी किमान 16 व कमाल 20 युनिट वीज निर्मिती होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाबरोबरच प्राचार्य ताजणे यांच्या संकल्पनेतून विद्यालयात गाडगे महाराज स्वच्छता अभियात तसेच सत्यनिकेतन संस्थेच्या आवारामध्ये विविध फुलझाडे व सुगंधी वनस्पतींची लागवडही करण्यात आली.यामुळे विद्यालय परिसरात स्वच्छ, सुंदर वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र चांगलेच कौतुक होत आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहरराव देशमुख, सचिव एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, डॉ. रमेश भारमल आदींनी विशेष कौतुक केले.

COMMENTS