सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गा क्र. ५२ या १०० कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. मात्र पहिल्या दिवसापासून ते
सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गा क्र. ५२ या १०० कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. मात्र पहिल्या दिवसापासून ते आजतागायत या चौपदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत आहे.
या चौपदरीकरणासाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्याचे व रस्त्याचे तटस्थपणे शासकीय व खाजगी संस्थेकडून तपासणी होणे गरजेचे आहे. प्रत्येक एक किलोमीटर अंतरावरील रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व साहित्याचे नमुने घेऊन ते जागेवरच सीलबंद करावेत आणि शासकीय व खाजगी संस्थेमार्फत निपक्षपणे या साहित्याची तपासणी व्हावी. अशी मागणी
माजी सभापती अप्पाराव गोपाळराव कोरे यांनी लोक आयुक्त मुंबई यांच्याकडे केली आहे.या मार्गाचे तपासणी होणे गरजेचे आहे. या भागातील शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. येणाऱ्या काळात हा महामार्ग जनतेसाठी मृत्युचा मार्ग ठरणार आहे. हे टाळण्यासाठी चौपदरीकरणाचे काम दर्जेदार व दणकट होणे गरजेचे आहे. असे यावेळी कोरे यांनी सांगितले
COMMENTS