Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीतून समाजाची नवनिर्मिती होते ः सचिन झगडे

श्रीगोंद्यात सर्व धर्मीय प्रार्थनेतून क्रांतिकारकांना अभिवादन

श्रीगोंदा : जागतिक मूलनिवासी अर्थात आदिवासी दिनानिमित्त मानवाच्या क्रांती-प्रतिक्रांती-उत्क्रांतीचा इतिहासाबद्दल माहिती सांगितली. क्रांती म्हणजे

डॉ. काळे करणार दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी
नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम वेगात ; 85 खांब राहिले उभे, नियोजित वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता
कपाटाची चावी बनवून देणाराने दोन तोळ्याचे दागिने नेले चोरून

श्रीगोंदा : जागतिक मूलनिवासी अर्थात आदिवासी दिनानिमित्त मानवाच्या क्रांती-प्रतिक्रांती-उत्क्रांतीचा इतिहासाबद्दल माहिती सांगितली. क्रांती म्हणजे आचार विचारात अचानक होणारा बदल, या क्रांतीमुळे समाजाची नवनिर्मिती होते असे सचिन झगडे यांनी प्रतिपादन केले.
क्रांती दिन 9 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. 1942 साली महात्मा गांधी यांनी ’भारत छोडो आंदोलन’ सुरू केले, ज्याला ’क्विट इंडिया मूवमेंट’ असेही म्हटले जाते. या दिवशी भारतीय जनतेने इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी क्रांती दिनी केले. क्रांती दिनाची सुरुवात सर्व धर्मीय प्रार्थनेने झाली. यामध्ये विविध धर्मांच्या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सर्व स्काऊट यांनी दीप प्रज्वलित करून क्रांतिकारकांना अभिवादन केले. शिक्षण विस्तार अधिकारी सिताराम भुजबळ यांनी हे आपले मनोगतात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास उलगडून क्रांतिकारकांना अभिवादन केले. या प्रसंगी दत्तात्रेय मोरे, संतोष शिंदे, बापू जाधव, लक्ष्मीकांत खेडकर, अंकुश हिंगणे, भगवान बोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास लोखंडे व आभार सुधीर साबळे यांनी मानले.

COMMENTS