म्हसोबावाडी प्रतिनिधी - रायते गावातील गरजू गरीब अंध महिलांना दिला मदतीचा हात.समाजसेवक व पत्रकार रशीद शेख यानी यावर्षीही रमजान ईद साजरी न करता त्

म्हसोबावाडी प्रतिनिधी – रायते गावातील गरजू गरीब अंध महिलांना दिला मदतीचा हात.समाजसेवक व पत्रकार रशीद शेख यानी यावर्षीही रमजान ईद साजरी न करता त्यानिमित्त व आपल्या मुलाच्या हुसेन शेख याच्या स्मृति प्रित्यर्थ कल्याण ग्रामीण मधील रायते गावातील निर्मला जाधव व द्रौपदी जाधव या गरजू गरीब व अंध महिलांना रेशन वाटप करून रमजान ईद निमित्त अनोखी सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी या महिलांना वस्त्र ही देन्यात आले. यावेळी पत्रकार भरत दलवी, रायते गावचे माजी सरपंच सुनील सुरोशी, सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशी, मिलिंद चन्ने, प्रणय सोनावणे, संजय सुरोशी, बबन जाधव आदि उपस्थित होते. यावेळी भरत दळवी यानी रशिद शेख यांच्या कार्याचे कौतुक केले. हुसैन शेख यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. रशीद शेख आजही रायते गावाला विसरले नाहित असेही भरत दळवी यांनी सांगितले. यावेळी राम सूरोशी यांनी आभार मानले. रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्त हा कार्यक्रम झाल्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन यावेळी घडले.
COMMENTS