Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजसेवकाला महिलांकडून बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही महिलांनी मिळून समाजसेवकाला मारहाण केल्याची घटना घडली

अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे
औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर
लाठीहल्ल्याचे पडसाद दुसर्‍या दिवशीही तीव्र

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही महिलांनी मिळून समाजसेवकाला मारहाण केल्याची घटना घडलीय. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत समाजसेवकाची महिलांनी धुलाई केली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब महिलेनं विचारला. यावर सामाजिक कार्यकर्त्यानं महिलेला शिवीगाळ केला आणि मारहाणही केली, असा आरोप महिलांनी केला आहे. ही मंगळवार रोजी दुपारचा सुमारास घटना घडली.संभाजीनगरमधील तालुका कन्नड येथील हा प्रकार असल्याचं समोर येत आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ समोर येताच खळबळ उडाली. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तीन महिला एका व्यक्तीला रस्त्यावर फिरवत मारहाण करत आहेत. याप्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यामध्ये परस्पराविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.दरम्यान, पोलिसांची दोन्ही बाजूंनी चौकशी सुरु असून गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही मारहाणीचे अनेक प्रकरणे संभाजीनगरमधून समोर आली आहेत. वाद होऊन, कशाचाही राग येऊन प्रकरणं मारहाणी पर्यंत पोहोचतात.

COMMENTS