कोपरगाव प्रतिनिधी : आजकाल प्रत्येकाचे जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रत्येक जन आपापल्या दैंनदिन कामात व्यस्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात सहभागी
कोपरगाव प्रतिनिधी : आजकाल प्रत्येकाचे जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रत्येक जन आपापल्या दैंनदिन कामात व्यस्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छा असुनही वेळच नसल्याने शक्य होत नाही. परंतु, अशाही काळात वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील ट्रस्टच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावात मोफत मदत सेवा केंद सुरु करून निराधारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, शेकडो शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देणे, गेले वर्षभर गावात स्वच्छता अभियान राबविणे, माणुसकीची भिंत, आरोग्य शिबिरे, वृक्ष लागवड असे विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. हे सर्वच उपक्रम निश्चितच सर्वासाठी दिशादर्शक असल्याचे मत कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मोफत मदत सेवा केंद्रास कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी मंगळवारी(दि.21) सदिच्छा भेट दिली. यावेळी साहेबांनी मोफत मदत सेवा केंद्रामार्फत चालणार्या कार्याची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. तसेच आजवर मोफत मदत सेवा केंद्राच्या माध्यमातून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनांच्या माध्यमातून वारीसह परिसरातील निराधारांच्या कागदपत्रांची मोफत पूर्तता करून गत सहा महिन्यात 200 पेक्षा जास्त प्रकरणे तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. ही सर्व प्रकरणे तहसीलदारांनी मंजूर देखील केली आहे. त्यातून गावातील 200 निराधारांना आधार मिळाला आहे. त्यामुळे सर्व स्वयंसेवकांनी तहसीलदार बोरुडे यांच्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्वहस्ताक्षरात अभिप्राय देखील नोंदवला. यावेळी मोफत मदत सेवा केंद्राचे स्वयंसेवक सरपंच सतीशराव कानडे, नरेंद्र ललवाणी, भाऊसाहेब टेके, मधुकर टेके, रोहित टेके, संजय कवाडे, पंडित लकारे, रवींद्र टेके, अशोक निळे, विलास गाडेकर, संदीप आगे, मनोज जगधने, अनिरुद्ध जाधव उपस्थित होते.
COMMENTS