Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड। प्रतिनिधीहिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान

झेंडावंदन मंत्री आणि नांदेडचे दुर्लक्ष : नांदेड जिल्ह्याच्या दुर्लक्षित प्रश्नाकडे पाहण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ सापडेना?
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपात विसंवादाचा भडका !
Nanded : सरकारच्या जीआरची होळी करत रयत क्रांती संघटनेचे आंदोलन | LokNews24

नांदेड। प्रतिनिधी
हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सुमारे 350 स्टॉल्स उभारण्यात येणार असून सामाजिक संघटनांनी भाविकांसाठी पाणी, प्रसाद व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच 24 जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वार्यातून निघणार्‍या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. या दोन दिवसांत 8 ते 10 लाख भाविक नांदेडमध्ये येण्याची शक्यता असून हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, सेवा व प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS