Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात

आ. राम शिंदे यांची उपस्थिती ; सचिन पोटरे यांच्या प्रबोधनकार प्रतिष्ठानचे आयोजन

कर्जत : दीपावली व पाडव्यानिमित्त कर्जतच्या कला रसिकांना सचिन पोटरे यांच्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने स

कृष्णा-भीमा स्थिरीकरणात जामखेड तालुक्याचा समावेश करा
डॉ. भास्कर मोरेला अटक करण्याची पोलिसांनी कृती करावी
कर्जत-जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजूर

कर्जत : दीपावली व पाडव्यानिमित्त कर्जतच्या कला रसिकांना सचिन पोटरे यांच्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने संगीत रजनीसह कर्जत शहरात सलग 1138 दिवस श्रमदान करून शहर स्वच्छ, सुंदर ठेवणार्‍या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचा आ. राम शिंदे व त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सचिन पोटरे यांच्या पत्नी सुवर्णा पोटरे व आई श्रीम. पद्मावती पोटरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी एकवीस हजार रुपये व प्रत्येक शिलेदाराचा भगवत गीता शाल, बुके देऊन सपत्नीक सत्कार केला.
टीव्ही स्टार कोमल सावंत- टेकुडे तसेच भालचंद्र व अनिल अडसूळ या पितापुत्रांच्या बासरी, व्हायोलिन व पॅनिका वादनाच्या या संगीतमय कार्यक्रमाला कर्जतकर रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी कर्जत तालुक्याचे भूमिपुत्र कारगिल येथे कार्यरत असणारे व कर्नल या महत्त्वाच्या पदावर देशाचे संरक्षण करणारे नितीन काळदाते तसेच अगदी कमी वेळेत सर्वसामान्य घरात ऊस तोड मजुरांच्या घरात चांदा बुद्रुक येथे जन्म घेतलेल्या व आता पुण्यात आपल्या औषध व्यवसायात जम बसवून आपला व्यवसाय 30 देशात घेऊन जाणारे मारुती जगताप यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पुणे पिपल्स बँकेच्या संचालकपदी राजेंद्र गांगर्डे यांची झालेली निवड व 17 वर्षीय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ब्राँझ मेडल पदक मिळवणारी मनस्वी किरण पाटील यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, प्रवीण घुले पाटील, गणेश पालवे, राहुल निंभोरे, पप्पू धोदाड, काका धांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन पोटरे यांनी आभार मानले.

श्रमदानाच्या कामगिरीचे कौतुक – आ. राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छता अभियानच्या संकल्पनेप्रमाणे सर्व सामाजिक संघटनेच्या या सलग 1138 दिवस श्रमदानाच्या कामगिरीचे कौतुक करत सर्व सामाजिक संघटना एक मोठा विक्रम करून शहराचे नाव देशपातळीवर मोठे करील असा विश्‍वास व्यक्त केला. सचिन पोटरे यांच्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठानचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे आ. शिंदे यावेळी म्हणाले.

COMMENTS