Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, उद्धव ठाकरेंना कफनचोर म्हणावे लागेल

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महा

लातूर पोलीस दलात अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने दाखल
नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
समृद्धी महामार्ग विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करतांना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी जम्बो कोविड सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांना तर कफन चोर म्हणावे लागेल, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची संपूर्ण चौकशी समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल, असा दावा देखील त्यांनी केला. कॅगच्या वतीने अद्याप कोविड काळातील घोटाळ्यांचे ऑडिट करण्यात आलेले नाही. नॉन कोविड ऑडिटमध्येच बारा हजार कोटींचे घोटाळे समोर आले असल्याचा दावा, फडणवीस यांनी केला आहे. कोव्हिडच्या ऑडिटमध्ये आणखी किती घोटाळे समोर येतील असे देखील ते म्हणाले. त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार आहे. हा जनतेचा पैसा होता, त्यांच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू, असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेपासून आम्ही 2017 मध्येच दूर झाले आहोत. त्यांच्या गोरख-धंद्यांमध्ये आम्ही त्यांची साथ देणार नसल्याचे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले होते. आम्ही राज्यात सोबत असतो तरी महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधात नसलो तरी त्यांच्यासोबतही नव्हतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. भ्रष्टाचार हा मुद्दा कायम राहणार आहे. कधी कधी इतर मुद्दे देखील समोर येतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना मनापासून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षा आहे. आणि त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकाचे नरेंद्र मोदी यांना समर्थन आहे. नरेंद्र मोदी यांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार होत नाही, त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक त्यांना पाठिंबा देत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. घोटाळ्यांची चौकशी होणारच असे देखील ते म्हणाले. असे 35 डॉक्टर समोर आले आहेत, त्यांनी कोविड सेंटर मध्ये कामासाठी केवळ अर्ज केले होते. मात्र, सेवा दिली नाही. तरी देखील त्यांच्या नावाने पूर्ण बिल काढण्यात आले आहे. म्हणजेच कोविड सेंटरमध्ये कोण होते? असा प्रश्‍न उपस्थित होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. अशी अनेक प्रकरण समोर येत असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS