पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू असून, 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, या दिवशी राज्यात सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यापूर
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू असून, 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, या दिवशी राज्यात सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी म्हणजे 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळांमध्ये असतात. मतदानासाठीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. या पार्श्वभूमीवर 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
COMMENTS