Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, राज्य अंधारात बुडण्याची भीती !

महावितरणचे कर्मचारी संपावर, संपात 30 संघटनांचा सहभाग

मुंबई/प्रतिनिधी ः अदानी समुहाला वीज वितरण परवाना देण्यास महावितरणच्या कर्मचार्‍यांची विरोध दर्शवला असून, वीजेच्या खासगीकरणाला विरोध करत महावितरण

Akola : जिल्हा परिषदच्या बंद गोडाऊनला भीषण आग | LOKNews24
शिवसैनिक तापले ! गद्दार आमदार तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले | LokNews24
ऑनलाईन शिक्षणामुळे घडली आत्महत्या |

मुंबई/प्रतिनिधी ः अदानी समुहाला वीज वितरण परवाना देण्यास महावितरणच्या कर्मचार्‍यांची विरोध दर्शवला असून, वीजेच्या खासगीकरणाला विरोध करत महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपाची सुरुवात आज मध्यरात्रीपासूनच करण्यात आल्यामुळे पुढील तीन दिवस कर्मचारी संपावर असणार आहे. यामुळे राज्यातील वीज वितरण व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता आहे. या संपाला 30 संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
अदानी पॉवर कंपनीने राज्यातील ठाणे, भांडूप, उरण परिसरात वीज वितरण करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडून परवाना मिळवला आहे. मात्र अजूनतरी राज्य सरकारने याला परवानगी दिलेली नाही. ही परवानगी देऊ नये, यासाठीच कर्मचार्‍यांची संपाचे हत्यार उपसले आहे. जर अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना मिळाल्यास, सामान्य ग्राहक आणि शेतकर्‍यांना वीज मिळविणे कठीण होणार असल्याची भीती महावितरणच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. त्यामुळे  या कंपन्यांनी संपाची हाक दिली आहे. तसेच गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊन अशी भूमिका महावितरणच्या कर्मचार्‍यांनी घेतली आहे.  महावितरणचे खासगीकरण केले जाणार आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या संपात राज्याताली 30 संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची असल्याची माहिती कर्मचार्‍यांनी दिली आहे.दरम्यान, खासगीरकरणाविरोधातील महावितरणच्या संपाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, देशातील विमानतळे, बंदरे, धारावी पुनर्विकास प्रकल्प, बीएसईएस यानंतर आता सरकारी वीज वितरण कंपनी महावितरण या कंपनीलाही केंद्रातील भाजप सरकार अदानी समूहाच्या घशात घालत आहे.’ भाजपवर आरोप करत आरोप आपने महावितरणच्या संपाला पाठिंबा दिला आहे.

अदानी समुुहाला वीज वितरणाचा परवाना देण्यास विरोध – महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी संप पुकारला असून, जर आपत्कालीन परिस्थितीत वीज गेल्यास संबंध राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकार देखील खासगीकरणाकडे वळतांना दिसून येत आहे. त्यानुसार अदानी पॉवर कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयेागाकडून ठाणे परिसरातील वाशी, उरण, भांडूप व ठाणे या चार ठिकाणी वीज वितरणाचा परवाना मिळवला आहे. मात्र राज्य सरकारने याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. ती मंजुरी देऊ नये, यासाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. मात्र राज्यात ऐनवेळी वीज वितरण व्यवस्थेत बिघाड झाल्यास राज्य अंधारात बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS