Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, लोक म्हणतात तो देवेंद्रवासी झाला  

खा. शरद पवारांची अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर एखादा दुसरा अपघात झाला आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोक असे म्हणतात, या अपघातात एक ’देवेंद्रवासी’ झ

कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल
मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार
शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर एखादा दुसरा अपघात झाला आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोक असे म्हणतात, या अपघातात एक ’देवेंद्रवासी’ झाला. तो रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण आज झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दु:खद आहे, असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष नाव न घेता टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामात त्रुटी, कमतरता असल्याची शक्यता बोलून दाखवली. समृद्धी महार्गावरील बसच्या अपघाताचे कारण कदाचित याठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन न करणे, हे असावे. त्याचा दुष्परिणाम म्हणून याठिकाणी अपघातांमध्ये लोक मृत्यमुखी पडत असल्याचे पवार म्हणाले. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना सतत सुरु आहेत. अपघात झाला की, राज्य सरकार मृतांना 5 लाख देते. त्याने हे प्रश्‍न सुटणार नाहीत. आतापर्यंत जे झाले ते वाईट झाले. यासंदर्भात देशातील रस्ते नियोजनाचे ज्ञान असलेले अत्यंत कर्तबगार लोक असतील त्यांचे एक पथक तयार करावे. त्यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी करुन घ्यावी आणि चूक कुठे झाली आहे, हे शोधून काढण्याचे आवाहन पवार यांनी केले. तसेच त्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मुद्द्यावरुन सरकारी यंत्रणेवर निशाणा साधला. समृद्धी महामार्गाबाबत निर्णय कोणी घेतला, ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनी जाणकारांचा सल्ला घेतला असेल. जर जाणकारांच्या सल्ल्याविना हे केले असेल तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी सरकारची आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. मी समृद्धी महामार्गावरुन काही किलोमीटर प्रवास केला होता. आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा काही खुणा आपल्या डोक्यात असतात. इथे वळण आहे, पुढे झाडे आहेत वगैरे गोष्टी आपल्या डोक्यात असतात. पण समृद्धी महामार्गावरील रस्ता सरळ आहे, आजुबाजूला काहीच नाही. या गोष्टीचा परिणाम वाहनचालकांवर होतो की काय, अशी शंका काहींनी बोलून दाखवली. पण मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कमतरता दूर केली पाहिजे. इंडियन रोड काँग्रेसकडून समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यात आल्याचे आणि सर्व मानके पाळण्यात आल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात येते. अपघातासाठी वाहनचालकांची चूक कारणीभूत असल्याचे सांगणे म्हणजे आपली कमतरता दुसर्‍यावर ढकलण्याचा प्रकार असल्याचे देखील पवार यांनी म्हटले आहे.

कोयता गँग राज्य सरकारची देणगी – पुण्यात दिवसेंदिवस कोयता गँगचा उच्छाद वाढत चालला आहे. कोयता गँगमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित आहे. कोयता गँगमुळे पुण्यातील गुन्हेगारी वाढली आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे. ’कोयता गँग या राज्य सरकारची देणगी आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कोयता गँग हे मी इतक्या वर्षात ऐकलेले नव्हते. ज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न आहे. महिलांवरील हल्ले, कोयता गँग या राज्य सरकारची देणगी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

COMMENTS