…तर, पंधरा कोटींचा महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

…तर, पंधरा कोटींचा महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल !

 मुंबई हे महानगर महाराष्ट्रात राखण्यासाठी १०५ मराठी वीरांना शहीद व्हावे लागले; ज्यांच्या स्मृतीत उभारलेला हुतात्मा स्मारक, याची ज्वलंत साक्ष देतो. ज्

…म्हणून शिक्षक विभागाने पाठवली शाळेला नोटीस l LOKNews24
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
शालेय प्रशासनावरही पॉक्सो लावा

 मुंबई हे महानगर महाराष्ट्रात राखण्यासाठी १०५ मराठी वीरांना शहीद व्हावे लागले; ज्यांच्या स्मृतीत उभारलेला हुतात्मा स्मारक, याची ज्वलंत साक्ष देतो. ज्या १०५ वीरांनी मुंबई महाराष्ट्रात राखण्यासाठी आपल्या छातीवर गोळ्यांचा वर्षाव झेलला, त्या वीरांवर गोळ्या झाडणारा तत्कालीन सत्ताधीश एक गुजराती ब्राह्मण होता; हा इतिहास आज स्मरण करण्यासाठी एक कारण तसेच पुढे येत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर थेट आरोप लावलाय की, गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय गृहमंत्रालयाला, मुंबई हे जागतिक किर्तीचे महानगर, जे १०५ मराठी वीरांचे बलिदान देऊन महाराष्ट्राने राखले आहे, त्यास केंद्रशासित प्रदेश बनविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. संजय राऊत यांच्यावर सध्या ईडीची कारवाई होतेय म्हणून त्या सूडभावनेतून त्यांनी हा आरोप केला असावा, असा काहींचा समज झाला असेल तर तो निखालस चूक ठरेल! याबाबत अमित शहा यांनी  राजभाषा समन्वय समितीच्या अध्यक्ष या नात्याने या समितीला देशात इंग्रजी भाषेला पर्याय प्रादेशिक भाषा नव्हे तर फक्त हिंदी हाच पर्याय निवडावा, असे आदेश दिले आहेत. अर्थात, या आदेशातून संजय राऊत यांनी अमित शहांवर मुंबई ला केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा डाव शिजत असल्याचा जो आरोप केला आहे, तो कसा सिध्द होवू शकेल? पण, इथेच खरी मेख आहे. भाषावार प्रांतरचना करताना देशाची अधिक शकले होतील, असा इशारा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांतरचना भारताला युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया अशा संबोधनाला पात्र होऊ देणार नाही! परंतु, समस्या ती नाही, तर भारतीय माणसे मानसिकदृष्ट्या  युनायटेड कशी होतील, हा खरा प्रश्न आहे. अर्थात, देशाच्या ‘ वन नेशन वन लॅंग्वेज’ यावर घटनाकारांनी परखड विचार मांडले आहेत, तो विषय आपला आजचा नाही. तर, आपला विषय आहे की, संजय राऊत जेव्हा आरोप करताना म्हणतात की, मुंबईत मराठी टक्का कमी झाला असून गुजराती भाषिकांची संख्या वाढली असल्याचे किरीट सोमय्या पुढील काळात सांगून मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करतील, आणि केंद्रीय गृहमंत्रालय त्यावर शिक्कामोर्तब करेल.‌ राऊतांचा आरोप राजभाषा समन्वय समितीच्या अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खरा वाटायला लागतो. महाराष्ट्राचा मुंबई हा अविभाज्य भाग आहे आणि असणार. महाराष्ट्रापासून मुंबई कोणीही तोडू शकणार नाही. कारण या मुंबई च्या अरबी समुद्राने देखील हुतात्म्यांच्या रक्ताचे पाट वाहिल्याचे बघितलं आहे. क्रांती करून मिळवलेली गोष्ट सहजासहजी बळकावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.‌कारण तसे करण्याचा प्रयत्न केला तर, त्या मराठी हुतात्मांचा वारसा असणाऱ्या पंधरा कोटींचा महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, ही वस्तुस्थिती सत्ताधिश कितीही मजबूत असो, त्यांनी या वास्तवाकडे दुर्लक्ष करू नये. साठ वर्षानंतर पुन्हा मुंबईला महाराष्ट्रापासून हिसकावून घेण्याचे  षडयंत्र कोणी करित असेल तर त्याविरोधात महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस प्राणपणाने विरोध करेल, यात कोणतीही शंका नाही. अर्थात, याची दुसरी बाजू देखील बघितली पाहिजे की, जे संजय राऊत मुंबईत मराठी टक्का राहिला नसल्याचे भांडवल किरीट सोमय्या करतील, असं म्हणतात त्यांनी मुंब‌ईतल्या मराठी माणसाचा टक्का का आणि कसा कमी झाला याचेही उत्तर द्यायला हवे. मराठी माणसाच्या अस्मितेचे स्फूलिंग चेतवून राजकारणात उतरलेली शिवसेना मजबूत असतानाही मुंबईतील मराठी टक्का कर्जत – कसारा च्या दिशेने कसा पुढे सरकला याचे उत्तरही स्थानिक पक्षांना द्यावे लागेल, हे निश्चित.

COMMENTS