Homeताज्या बातम्यासंपादकीय

…तर, ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील!

कर्नाटकातल्या निवडणुका संपल्या बरोबर महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाचे वेध लागतील, असे संकेत आता सर्व स्तरातून मिळू लागले आहेत. त्यामुळे शरद पवार

ठसठसणारे मणिपूर आणि प्रश्न ! 
आत्मकेंद्री कर्मचारी वर्ग !
आत्मस्तुतीत रमलेला अर्थसंकल्प !

कर्नाटकातल्या निवडणुका संपल्या बरोबर महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाचे वेध लागतील, असे संकेत आता सर्व स्तरातून मिळू लागले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदावरून  राजीनामा देण्याच्या घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पासून वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली; आता त्याला जवळपास 24 वर्षे झाली आहेत. सर्व शक्तिमान नेतृत्व असतानाही त्यांच्या पक्षाला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची हुलकावणी सातत्याने राहीली. अर्थात आघाडीच्या सत्तेत त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खाती असली तरी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला राष्ट्रवादीचे नेतृत्व म्हणून बसता आले नाही हे खंत निश्‍चितपणे असावी. मात्र, आता घटनात्मक संरक्षणाच्या दृष्टीने वर्तमान राज्य सरकारच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय,  कर्नाटक निवडणुकीनंतर म्हणजे 10 मे नंतर व घटनापीठातील  एक न्यायाधीश सेवानिवृत्त होण्याच्या तारखेच्या अगोदर म्हणजे 15 मे च्या अगोदर निकाल येणार आहे आणि त्यात वर्तमान सरकार विषयी अस्थिरता असेल, असा अंदाज आता सर्वत्र व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जर नव्या पद्धतीने सरकार गठीत करण्याची प्रक्रिया आली, तर त्यात राष्ट्रवादीला नेतृत्व देऊन सरकार बनवण्याची पूर्ण कसरत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे करतील, अशी शक्यता पूर्णपणे वर्तवली जात आहे. शरद पवार यांचे आजचे वय 83 वर्षे. म्हणजे वयाची आठ दशके ओलांडली आहेत. तर त्यांच्या राजकारणाने वयाची सहा दशक ओलांडली आहेत. या संपूर्ण राजकीय प्रवाहात त्यांचे राजकारण महाराष्ट्राला अनाकलनीय राहिले असले तरी, उघडपणे ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत आघाडी करणारे कधीही राहिले नाही, ही वस्तुस्थिती आहे! त्यामुळे, जर पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर, आपले दीर्घ राजकीय आयुष्य वैचारिक पातळीवर कलंकित होऊ नये, म्हणून आपण पक्ष नेतृत्वाची धुरा सोडावी आणि त्यानंतर राजकीय आघाडी भाजपा बरोबर झाली तर त्यानंतरच्या होणार्‍या वैचारिक आरोपांपासून आपली मुक्ती करून घ्यावी, ही त्यांची राजकीय खेळी यामागे आहे. त्यांच्या या राजकीय खेळीमुळे अजित पवार हे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, क्रिकेट आणि राजकारण अशा दोन्ही ठिकाणी अनिश्‍चितता कायम असते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रात कोणतेही भाकीत खूप ठामपणे व्यक्त करणे हे निश्‍चितपणे अवघड असते. तरीही, महाराष्ट्राचे राजकारण सध्या ज्या पद्धतीने जात आहे, ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्राची राजकीय सत्ता सांभाळणार आणि अजित पवार यांना आपल्या संपूर्ण आयुष्यात मुख्यमंत्रीपदाने  दिलेली हुलकावणी ते निश्‍चितपणे आता सफल होऊ देणार नाहीत. अर्थात, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊन आणि त्यानंतर फार कमी वेळातच येऊ घातलेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, या विचारात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीतील राजकीय आघाडी ही निश्‍चितपणे भाजपा बरोबर करावी लागेल; किंबहुना, तशी केली जाईल आणि जर तसे झाले तर एकूणच देशाच्या राजकारणावरही त्याचा परिणाम होणार! कारण, केंद्रातील भाजप सत्तेविरोधात देशात बनत असलेली राजकीय आघाडी ही ज्या पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे, ते पाहता शरद पवार यांना त्या आघाडीपासून वेगळे राहता येऊ शकत नाही. कारण त्यांच्यावर ते नैतिक बंधन आहे. त्यामुळे जर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला अधिक यश मिळाले, तर, शरद पवार निश्‍चितपणे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील, यात शंकाच नाही!

COMMENTS