Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तर, देशातून लोकशाही गायब होईल – उद्धव ठाकरे

आपचे नेते अरविंद केजरीवालांनी घेतली मातोश्रीवर भेट

मुंबई/प्रतिनिधी ः लोकशाही जपण्यासाठी, टिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आलो आहोत. यंदाचे वर्ष निवडणुकीचे आहे. त्यामुळे यावेळी जर गाडी सुट

सरकार मतपेटीतून यायचे आता खोक्यातून येतात
उद्धव ठाकरेंना धक्का;
मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी… मुख्यमंत्री ठाकरे – शरद पवारांची बैठक

मुंबई/प्रतिनिधी ः लोकशाही जपण्यासाठी, टिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आलो आहोत. यंदाचे वर्ष निवडणुकीचे आहे. त्यामुळे यावेळी जर गाडी सुटली तर देशातून लोकशाहीच गायब होईल, असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेल्या काही दिवसांत दुसर्‍यांदा मातोश्रीवर आले आहेत. काही लोक फक्त राजकारण करतात. मात्र, आम्ही राजकारणापलीकडे जाऊन नाते जपतो. नाते जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. येणारा काळ हा निवडणुकांचा काळ आहे. यावेळी जर आपली ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. विरोधक हा गोलमाल शब्द आहे. आम्ही सर्वजण देशप्रेमी आहोत. देशातून ज्यांना लोकशाही हटवायची आहे, अशा लोकशाहीविरोधी शक्तींचा सामना करण्यासाठी आम्ही एक आलो आहोत. नुकताच सनदी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत दिल्ली सरकारला अधिकार देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. लोकशाहीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. मात्र, केंद्र सरकारने त्याविरोधात अध्यादेश काढला. ही कोणती लोकशाही आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दिल्लीत लोकांनी निवडलेले सरकार आहे. लोकांनी निवडलेले प्रतिनिधी आहेत. त्यांना काही अधिकार नको का? कदाचित येत्या काळात राज्यात निवडणुकाच होणार नाहीत. फक्त केंद्रातच निवडणूक होईल आणि देशात एकच सरकार असेल. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोक्याचे आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारने दिल्ली सरकारविरोधात काढलेला अध्यादेश अत्यंत चुकीचा आहे. लोकशाहीविरोधी आणि लोकांनी निवडलेल्या सरकारचे अधिकार कमी करणारा हा अध्यादेश आहे. लोकसभेत भाजपचे बहुमत आहे. तेथे तो विनासायास मंजूर होईल. मात्र, राज्यसभेत विरोधकांचे बहुमत आहे. त्यामुळे आम्ही राज्यसभेत हा अध्यादेश मागे घ्यायला लावू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मोदी सरकार 2024 मध्ये सत्तेवर येणार नाही ः केजरीवाल आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधातील अध्यादेशाला विरोध करण्याचे आश्‍वासन आम्हाला दिले आहे. राज्यसभेत शिवसेना आम्हाला पाठिंबा देणार आहे. जर राज्यसभेत अध्यादेश रद्द झाला तर 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. सध्याचे केंद्र सरकार अहंकारी आहे. या सरकारने आम्हाला सभागृह चालवण्यापासूनही रोखले. आम्हाला त्यासाठी कोर्टात जावे लागले. हे असेच चालू राहिले तर उद्या पंतप्रधान आणि 31 राज्यपालांनी मिळूनच देश आणि राज्य चालवावे, असा घणाघाती हल्लाही केजरीवाल यांनी केला.

COMMENTS