Homeताज्या बातम्यादेश

हिमाचलमध्ये बर्फवृष्टी ; रस्ते बंद झाल्याने प्रवाशांची कोंडी

शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनालीमधल्या हवामानामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झालेल

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची प्रकाश सोनवणे यांनी घेतली भेट
येवल्यात ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न (Video)
विदर्भातील अनेक गावांना पावसाचा तडाखा

शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनालीमधल्या हवामानामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्याचवेळी गेल्या 24 तासांमध्ये हिमाचल प्रदेशात झालेलया बर्फवृष्टीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
कुल्लूमधील धुंडी आणि मनाली-लेह महामार्गावरील अटल बोगद्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दरवाजांवर सुमारे 1,500 वाहने बर्फात अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वाहने हटवण्यासाठी मोठी बचाव मोहीम राबवण्यात आली आहे. अटल बोगदा आता प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लांब वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि अनेक पर्यटक रात्रभर वाहनांमध्ये अडकून पडले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये वाहन घसरल्याने झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

COMMENTS