कोपरगाव तालुका ः महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी कोपरगाव मतदारसंघाच्या मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांन
कोपरगाव तालुका ः महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी कोपरगाव मतदारसंघाच्या मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी भगिनी सहाय्यता कक्ष उभारले आहे.अर्ज भरण्यासाठी स्वतः स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव येथील सहाय्यता कक्षात उपस्थित महिला भगिनींचे अर्ज स्वतः भरले. स्नेहलता कोल्हे या आपला अर्ज भरत असल्याने उपस्थित महिला वर्गात मोठा कुतूहलाचा विषय झाला.
लाडकी बहिण आपल्या लाडक्या भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रावर आल्याने एकच उत्साह महिला वर्गात बघायला मिळाला. स्नेहलताताई कोल्हे यांचे मोठे काम बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होण्यासाठी आहे. हजारो महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान आजवर दिले आहे.दीड हजार रुपये प्रति महिना लाभ लाडकी बहीण योजनेतून होणार असल्याने दिलेल्या मुदतीत आपला अर्ज दाखल व्हावा यासाठी आमचे सर्वत्र बचत गट, गावोगावचे कार्यकर्ते, युवासेवक यांच्या माध्यमांतून मोहीम सुरू असून त्याचा लाभ महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन कोल्हे यांनी यावेळी केले. महिलांना मिळणारे अर्थसहाय्य हे कुटुंबाला काहीसा आधार होईल अशी अपेक्षा आहे.कोणतीही महिला आपल्याकडे असणारे पैसे हे जपून खर्च करते त्यामुळे ही योजना उपयुक्त ठरेल असा माझा विश्वास आहे.माझी कोणतीही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न सर्वत्र लवकरात लवकर अर्ज भरून घेण्याचा आहे. इतर शासकीय योजना लागू असणार्या भगिनींना त्यांच्या योजनेचे पैसे वेळच्या वेळी खात्यावर जमा व्हावे अशी विनंती शासनाला कोल्हे यांनी केली आहे.
महिलांची गर्दी – महिला नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उभारलेल्या लाडकी बहीण अर्ज नोंदणी व सहाय्यता कक्षात आगमन होताच महिला मंडळ ते विधिमंडळ गाठणार्या आपल्या लाडक्या बहिणीसोबत सेल्फी काढण्यासाठी भगिनींनी मोठी गर्दी केली होती.
COMMENTS