Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकलमध्ये लेडीज डब्यात साप

मुंबई प्रतिनिधी - मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अनेक नवनवीन किस्से हे रोजच्या प्रवासादरम्यान घडत असतात. पाऊस तर कधी तांत्

‘या’ कारणामुळे 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या | ‘१२च्या १२बातम्या’ | LokNews24
’निर्भया’तील वाहने पुन्हा महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात
बेलापूरातील सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला वचक

मुंबई प्रतिनिधी – मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अनेक नवनवीन किस्से हे रोजच्या प्रवासादरम्यान घडत असतात. पाऊस तर कधी तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ही विस्कळीत होत असेत. एरवी महिलांच्या डब्यात कुणी इतर चढलं तर महिला आरडाओरडा करतात, मात्र यावेळी महिलांच्या डब्यात दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क साप शिरला. लोकलमध्ये सारेकाही आलबेल असताना अचानक एका डब्यात ‘साऽऽप, साऽऽप’ची आरोळी उठली आणि प्रवाशांच्या गप्पा थांबल्या, भांडणांना ब्रेक लागला, धक्काबुक्कीही शांत झाली! नंतर एकच धावपळ उडाली ती सापाने वेटोळे घातलेल्या जागेपासून दूर सरकण्याची! एरवी गर्दीच्या वेळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या लोकलमध्ये मुंगी शिरण्यास जागा नसते असे विनोदाने म्हटले जात असतानाच, आपल्या डब्यात चक्क सापाने जागा पटकवल्याचे महिला प्रवाशांच्या लक्षात आले आणि पुढील प्रवास त्यांनी जीव मुठीत धरूनच केला. यानंतर स्टेशनवरील पोलीस गार्डला बोलावण्यात आलं असून त्यानं महिलांच्या डब्यात जाऊन तपासलं असता कोणताही साप लोकलमध्ये सापडला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

COMMENTS