Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘गुरुराज’ तर्फे सुरळीत गॅस पुरवठा : जगताप

कोपरगाव शहर : तालुक्यातील गुरुराज एचपी गॅस एजन्सी मध्ये मुबलक प्रमाणात गॅस टाक्यांचा साठा उपलब्ध असून ग्राहकांना सुरळीतपणे गॅस पुरवठा केला जात असल्याची माहिती गुरुराज एचपी गॅस एजन्सीचे संचालक विशाल जगताप यांनी दिली आहे.  याविषयी गुरुराज एचपी गॅस एजन्सी चे संचालक विशाल जगताप यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईच्या अफवा पसरत आहे. त्यात कोणतेही तथ्य नसून संकट काळात देखील गुरुराज एचपी गॅस एजन्सीच्या घरगुती ग्राहकांना शासन नियमानुसार अखंड सुरळीतपणे गॅस पुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी नंबर प्रत्यक्ष गॅस सिलेंडर ताब्यात घेतल्यानंतर संबंधित गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यास द्यावा. पूर्वी गॅस बुक करण्यासाठी २१ दिवसाची मर्यादा होती ती आता २५ दिवसाची झाली असून गॅस बुक केल्यानंतर अवघ्या २ ते ४ दिवसातच गॅस एजन्सी मार्फत गॅस पुरवठा घरपोच केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही एजन्सीवर विनाकारण गर्दी करून आपला वेळ वाया घालू नये तसेच ज्या ग्राहकांनी अद्यापही आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी केलेली नाही ती देखील त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी. संकटकाळी देखील अत्यंत नियोजनबद्ध गॅस पुरवठा करणाऱ्या गुरुराज एचपी गॅस एजन्सी चे १३ हजारहून अधिकचे ग्राहक असून या सर्वांना अतिशय सुरळीतपणे पुरेपूर गॅस पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन गुरुराज एचपी गॅस एजन्सीचे संचालक विशाल जगताप यांनी केले आहे.

विकासकामे रखडल्याने प्र. १४ मध्ये अपघात : लहिरे
कोपरगावात सुशोभीकरण कामांचे लोकार्पण; ‘नमामी गोदावरी’सह विविध नामफलकांची उभारणी
कोपरगावात ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’ जल्लोषात; विवेक कोल्हेंसह  हजारों भाविकांची उपस्थिती

कोपरगाव शहर : तालुक्यातील गुरुराज एचपी गॅस एजन्सी मध्ये मुबलक प्रमाणात गॅस टाक्यांचा साठा उपलब्ध असून ग्राहकांना सुरळीतपणे गॅस पुरवठा केला जात असल्याची माहिती गुरुराज एचपी गॅस एजन्सीचे संचालक विशाल जगताप यांनी दिली आहे.

 याविषयी गुरुराज एचपी गॅस एजन्सी चे संचालक विशाल जगताप यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईच्या अफवा पसरत आहे. त्यात कोणतेही तथ्य नसून संकट काळात देखील गुरुराज एचपी गॅस एजन्सीच्या घरगुती ग्राहकांना शासन नियमानुसार अखंड सुरळीतपणे गॅस पुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी नंबर प्रत्यक्ष गॅस सिलेंडर ताब्यात घेतल्यानंतर संबंधित गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यास द्यावा. पूर्वी गॅस बुक करण्यासाठी २१ दिवसाची मर्यादा होती ती आता २५ दिवसाची झाली असून गॅस बुक केल्यानंतर अवघ्या २ ते ४ दिवसातच गॅस एजन्सी मार्फत गॅस पुरवठा घरपोच केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही एजन्सीवर विनाकारण गर्दी करून आपला वेळ वाया घालू नये तसेच ज्या ग्राहकांनी अद्यापही आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी केलेली नाही ती देखील त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी.

संकटकाळी देखील अत्यंत नियोजनबद्ध गॅस पुरवठा करणाऱ्या गुरुराज एचपी गॅस एजन्सी चे १३ हजारहून अधिकचे ग्राहक असून या सर्वांना अतिशय सुरळीतपणे पुरेपूर गॅस पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन गुरुराज एचपी गॅस एजन्सीचे संचालक विशाल जगताप यांनी केले आहे.

COMMENTS