Homeताज्या बातम्याविदेश

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला.

जपान प्रतिनिधी - जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जपानमधील वाकायामा शहरात भाषणादरम्यान एका व्यक्तीने  स्मोक बॉम्ब फेकल्याची धक्कादायक

तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार,१० जून २०२२ | LOKNews24
भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप
बोरगाव येथे स्वीट दुकानाला आग, दुकानं पूर्ण भस्म होऊन लाखो रुपयांचे नुकसान.

जपान प्रतिनिधी – जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जपानमधील वाकायामा शहरात भाषणादरम्यान एका व्यक्तीने  स्मोक बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ‘द जपान टाईम्स’च्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार होते, त्याआधीच हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. या घटनेचा व्हिडीओ देखिलस अमोर आला आहे. या व्हिडीओत घटनास्थळी जमलेले लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी धावताना दिसत आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. सभेत झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ते भाषण करणार होते, असे सांगण्यात येत आहे. फुमियो किशिदा 2021 मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. यासोबतच ते लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (एलडीपी) अध्यक्ष आहेत. त्यांनी 2012 ते 2017 पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आणि 2017 मध्ये त्यांनी कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून काम केले. 2017 ते 2020 पर्यंत त्यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवले. नुकतेच किशिदा भारतात आले होते, भारतात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं

COMMENTS