नाशिक (प्रतिनिधी) :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या सहा विद्यार्थ्यांनी 'राष्
नाशिक (प्रतिनिधी) :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रकुल संसदीय मंडळ’ अभ्यासवर्गात सक्रिय सहभाग घेतला. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिनांक ०८ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा अभ्यासवर्ग संपन्न झाला.
लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संसदीय शासन प्रणाली आणि विधिमंडळ कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने सन १९६४ पासून राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा विधान भवन (मुंबई) यांच्यातर्फे दरवर्षी या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या या अभ्यासवर्गाचे उद्घाटन राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधासभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर अभ्यासवर्गात संसदीय आयुधे, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे महत्व आणि भूमिका, लोकशाही प्रणाली, कायदे निर्मिती प्रक्रिया, विधिमंडळ भूमिका, प्रसारमाध्यमे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना विधानसभा आणि विधानपरिषद, तेथील विविध शासकीय समित्या, ग्रंथालय यांची पाहणी करत प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळाली. अभ्यासवर्गाचा समारोप केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आ. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या सहा दिवसीय अभ्यासवर्गासाठी राज्यातील १२ विद्यापीठांचे जवळपास ७२ विद्यार्थी उपस्थित होते. त्यात मुक्त विद्यापीठाकडून शैक्षणिक संयोजक डॉ. सुनील भारोडकर यांच्या नेतृत्वाखाली कु. मयूरी जामनिक, कु. दिव्या आंबेकर, श्री. आदित्य गावंडे, श्री. मोहन भांगरे, कु. अस्मिता ढेंबरे आणि श्री. विनायक यादव हे सहा विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे आणि मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा संचालक डॉ. नागार्जुन वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS