Homeताज्या बातम्यादेश

पाटण्यात सहा जणांचा होरपळून मृत्यू

पाटणा ः बिहार राज्यातील पाटणा जंक्शनपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलला गुरूवारी लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ह

पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणार ः उपमुख्यमंत्री फडणवीस
कालिका फर्निचरच्या ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ
ध्येयपूर्ती मुलाचे वस्तीगृहातून सुरज बलवत कोणालाही न सांगता हिरापूरच्या पुलाजवळ पोहोचला

पाटणा ः बिहार राज्यातील पाटणा जंक्शनपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलला गुरूवारी लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग पाल हॉटेलला अचानक लागली. या आगीने आजूबाजूच्या तीन हॉटेलदेखील जळून खाक झाल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुष आहेत. शहराचे पोलिस आयुक्त सेंट्रल सत्यप्रकाश यांनी सांगितले की, जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 20 लोक सध्या झचउक मध्ये उपचार घेत आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.
आगीमुळे 45 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 51 गाड्यांच्या पाण्याचा वापर करण्यात आला. आग विझवल्यानंतर बचाव पथक हॉटेलच्या आत गेले, जिथे मृतदेह बाहेर काढण्यात आला. आगीमुळे पाटणा स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत 4 मजली होती. आग सर्व मजल्यांवर पसरली होती. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हायड्राचाही वापर करण्यात आला. आगीमुळे हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सिलिंडरचाही स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत हॉटेलशेजारील इमारतही जळून खाक झाली.

COMMENTS