Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कैद्याचे मृत्यू प्रकरणी कोल्हापूरात सहा जणांवर खूनाचा गुन्हा

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिवीगाळ केल्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीत निशिकांत बाबूराव कांबळे (वय 47, रा. शिवाजी पेठ) या कैद्याचा म

कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी : रामदास आठवलेंचा जावईशोध
लव्ह-जिहाद-धर्मांतरसह महामानवांच्या अवमानाबद्दल पाटण येथे निषेध मोर्चा
कराड पालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर दबावाचे राजकारण सुरु

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिवीगाळ केल्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीत निशिकांत बाबूराव कांबळे (वय 47, रा. शिवाजी पेठ) या कैद्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहा कैद्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या तिघांचा समावेश आहे. सीसीटीव्हीतून हा प्रकार पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अक्षय तुकाराम काळभोर (वय 26), सचिन राजाराम ढोरे-पाटील (वय 32, दोघे रा. पुणे), इलियास मुसा मुल्ला (वय 33, रा. सांगली), बबलू संजय जावीर (वय 33, रा. इचलकरंजी), किरण ऊर्फ करण प्रकाश सुर्यवंशी (वय 37, रा. खानापूर, जि. सांगली) आणि शिवाजी तिप्पन्ना कांबळे (रा. कोल्हापूर) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निशिकांत कांबळे हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला येथील दवाखान्याजवळील स्वतंत्र जागेमध्ये ठेवण्यात आले होते. कारागृहात संशयित शिवाजी कांबळे हा येथे शिक्षा भोगत आहे. संशयित अक्षय काळभोर, सचिन ढोरे-पाटील, बबलू जावीर हे तिघे मोका अंतर्गत कारवाईतील बंदी असून करण सुर्यवंशी आणि इलियास मुल्ला हे दोघे न्यायालयीन बंदी आहेत. तुरूंगाधिकारी विठ्ठल शिंदे हे कारागृहात कर्तव्य बजावत होते.
संशयित शिवाजी कांबळे याने दुपारी निशिकांत कांबळे याला शिवीगाळ केली. याचा राग निशिकांत याला आला. त्यांच्यात भांडण झाले. यानंतर निशिकांत याला अस्वस्थ वाटत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळाली. त्यांनी त्याला तातडीन कारागृहातील रुग्णालयात व तेथून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले.
तुरुंगाधिकारी शिंदे यांनी सायंकाळी कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजची तपासणी केली. त्यावेळी निशिकांत याला संशयित अक्षय, सचिन, इलियास, बबलू, किरण आणि शिवाजी या सहाजणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान उपचार सुरू असताना निशिकांत याचा रात्री उशिरा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. यासंबधीची फिर्याद शिंदे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सहा संशयितांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद केला. याबाबत अधिक तपास सपोनि अरविंद कांबळे करत आहेत.

COMMENTS