Homeताज्या बातम्यादेश

हरियाणात सिलिंडर स्फोटात सहा जणांचा मृत्यू

पानीपत/वृत्तसंस्था ः हरियाणा येथील पानिपतच्या तहसील कॅम्प परिसरात घरगुती सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी

प्रामाणिक मिळकत धारकांची बक्षीसे कागदावरच
क्रूरतेचा कळस ! पोटच्या मुलावर तलवारीने वार | LOKNews24
प्राथमिक शिक्षक बँक बिनविरोध?…इब्टाने घेतला पुढाकार

पानीपत/वृत्तसंस्था ः हरियाणा येथील पानिपतच्या तहसील कॅम्प परिसरात घरगुती सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. गुरुवारी सकाळी स्वयंपाक बनवत असताना या कुटुंबासोबत ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सीला केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. अब्दुल करीम (वय, 48) त्यांची पत्नी अफरोज (वय, 45) रेश्मा (वय, 16) आणि इशरत (वय, 18 वर्षे) अब्दुश (वय, 12) आणि अकफान (वय, 10) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. करीम हा पश्‍चिम बंगालमधील स्थलांतरित मजूर होता असून तो एका भाड्याच्या खोलीत आपल्या कुटुंबासह राहत होता. गुरूवारी सकाळी स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. आग इतकी वेगानं पसरली की, त्यांना आतून बाहेर पडण्याची किंवा आवाज करण्याची संधीही मिळाली नाही. यात सहा जणांचा मृत्यू झाला.

COMMENTS