Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 संगमनेरमध्ये सहा घरांवर अज्ञात चोरट्यांकडुन दरोडा

 अहमदनगर प्रतिनिधी- संगमनेर शहरा नजीक असलेल्या सुकेवाडी शिवारात चार घरांवरती आज्ञात 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे

निळवंडेतून पाणी सोडण्याची घाई दबावापोटी नको
 धर्मग्रंथाची विटंबना करणार्‍यांना अटक करा ः मोरे
नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN

 अहमदनगर प्रतिनिधी– संगमनेर शहरा नजीक असलेल्या सुकेवाडी शिवारात चार घरांवरती आज्ञात 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे , याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुनील शिवाजी नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरून आज्ञात सहा दरोडेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नागरीकांच्या घरातून एकूण पाच लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी चोरून नेला आहे, या दरोडेखोरानी  घरातील छोट्या छोट्या लहान मुलींनाही  धमकावून त्यांच्या कानातील सोनं काढून घेतलं. दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपुरे पोलीस बळ सक्षम अधिकारी नसल्याने परिसरात चोऱ्या वाढत असल्याची तक्रारी महिला वर्गातून व्यक्त होत आहे. पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात संकेत नवले या कॉलेज युवकाचा मृतदेह आढळून आला होता, त्याचे मारेकरी ही अजून मोकाटच फिरत आहे, त्याचाही तपास बाकी असताना संगमनेर शहरात हा दरोडा पडल्याने या परिसरातील नागरिक भयभीत  झाले आहे. 

COMMENTS