शिवसेना पदाधिकार्‍याच्या भावास ठार मारण्याची धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना पदाधिकार्‍याच्या भावास ठार मारण्याची धमकी

आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर शिवसेना पदाधिकारी व शहर उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांचे बंधू राजेश तुकाराम जाधव (वय 54, रा.सातभाई मळा, दिल्लीगेट) यांना

कोपरगाव तालुक्यातून दहावीत परीक्षेत समृद्धी शेळके द्वितीय      
ठेकेदारांच्या आंदोलनामुळे मनपाची विकासकामे ठप्प
अवैध दारू व्यवसायातून खिरविरे येथील तरुणावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर शिवसेना पदाधिकारी व शहर उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांचे बंधू राजेश तुकाराम जाधव (वय 54, रा.सातभाई मळा, दिल्लीगेट) यांना कोर्टातील केस मागे घेण्यासाठी दबाव टाकून केस मागे न घेतल्यास त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (दि.30) सकाळी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मनसे पदाधिकार्‍याचाही समावेश आहे. मदन पुरोहित, अजित पुरोहित व मनसेचे पदाधिकारी परेश पुरोहित अशी आरोपींची नावे आहेत.

जाधव आणि पुरोहित कुटुंबियांमध्ये जुने वाद आहेत. यातून यापूर्वीही परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. रविवारी सकाळी 10 वाजता राजेश जाधव हे त्यांचे भाऊ सतीश जाधव यांना औषधे देण्यासाठी साताळकर हॉस्पिटल येथे गेले असता मदन पुरोहित याने जाधव यास ‘कोर्टात चालू असलेली केस मागे घे’, असे म्हणत हाताने मारहाण करून ढकलून दिले. त्यानंतर राजेश हे भाऊ सतीश जाधव यांच्या घरात गेले. त्यानंतर मदन पुरोहित, अजित मदन पुरोहित व परेश पुरोहित हे घराच्या दारात आले व हातात सत्तूर व तलवार घेऊन शिवीगाळ केली. ‘तुम्ही आमच्याविरुध्द विनयभंगाची कोर्टात चालू असलेली कसे मागे घ्या, नाहीतर तुझे संपूर्ण खानदान खल्लास करून टाकू’, अशी धमकी दिली. तसेच परेश पुरोहित यानेही राजेश जाधव यास मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी मदन पुरोहित, अजित पुरोहित, परेश पुरोहित यांच्याविरुध्द कलम 323, 504, 506, 34 व आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

COMMENTS