Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पथदिवे घोटाळाप्रकरणी एसआयटी करणार तपास

मुंबई ः सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील पथदिवे वीज देयके प्रकरणात एस आयटी नेमण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत य

पक्षासाठी कायपण ! भाजप आमदार थेट स्ट्रेचरवरुन विधानभवनात | LOK News 24
 मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला
नवाब मलिकांच्या अडचणी पुन्हा वाढणार ;जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून याचिका

मुंबई ः सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील पथदिवे वीज देयके प्रकरणात एस आयटी नेमण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत विधान परिषदमध्ये गोपीचंद पडळकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.तसेच आमदार सतेज पाटील यांनीही प्रश्‍न उपस्थित केला होता.यावर उदय सामंत यांनी 15 दिवसात यावर एसआयटी नेमण्याचे आश्‍वासन देण्यात आले. सार्वजनिक वीज देयके दरमाह अकाउंट पेयी धनादेशाने महावितरणने निश्‍चित केलेल्या भरणा केंद्राकडे जमा होत असून, वीज देयके भरणा केंद्राकडे दिलेल्या धनादेशातून महानगरपालिकेचे पूर्ण वीज देयक न भरता खाजगी व्यक्तीची वीज देयके भरल्याची बाब सन 2020 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय याबाबत पडळकर यांनी विचारले असता सामंत यांनी याबाबत घोटाळे झाला असल्याचे मान्य केले.

COMMENTS