मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात यंदा तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. सर्वाधिक जागा असलेली ही परीक्षा असून, या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी परीक्ष
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात यंदा तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. सर्वाधिक जागा असलेली ही परीक्षा असून, या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी तब्बल एक हजार रुपये परीक्षा फी घेवून देखील या परीक्षेतील गोंधळ काही संपण्याची चिन्हे नाहीत. कारण तलाठी परीक्षेच्या वेळी डाऊन झालेले सर्व्हर आणि पहिल्याच दिवशी पेपर फुटीचा प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान डाऊन झालेले सर्व्हर, पहिल्याच दिवशी झालेले पेपर फुटण्याचे प्रकरण, म्हाडा भरती परीक्षा प्रक्रियेत झालेले गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे घडत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. जयंत पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत त्यांनी म्हटले आहे की, सरकारने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व प्रकरणांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व प्रामाणिक परिक्षार्थीना न्याय द्यावा. तसेच, असे प्रकार पुनश्चः घडू नयेत व शासकीय गट क व गट ’ड’ पदांची भरती पारदर्शकपणे होण्याकरीता कायम स्वरुपी यंत्रणा निर्माण करावी. याकरीता केंद्र शासनाच्या कर्मचारी चयन आयोगाच्या धर्तीवर राज्य शासनाने स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्येच गट क व गट ’ड’ पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करुन त्यामार्फत या पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुलांमध्ये गैरप्रकारामुळे नैराश्य – नाशिक येथील एका परिक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली असून परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात येत असल्याचे प्रकार देखील घडत असल्याचे निदर्शनास आले आहेत. नागपूर येथील परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठविण्यात आल्याचे समजते. यापूर्वी वनविभागाच्या भरतीसंदर्भात देखील असेच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. म्हाडा भरतीमध्ये गैरप्रकार करणार्या 60 आरोपीवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. अशा प्रकारच्या वारंवार घडणान्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असून त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पारदर्शकतेसाठी स्वतंत्र आयोग नेमा – परीक्षेदरम्यान गोंधळ, गैरव्यवहार अशा घटना पुन्हा घडू नये आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या धर्तीवर स्वतंत्र आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
COMMENTS