Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींब्या देण्यासाठी पाथर्डीत लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह

पाथर्डी प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील सराटी या ठिकाणी गेल्या आठ त

शेतकरी आणि वीज वितरण अधिकारी यांच्यामध्ये अड.प्रताप ढाकणे यांनी घडवून आणली चर्चा
अक्षय कुमारपाठोपाठ 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण | 12 च्या १२ बातम्या | Lok News24
मधुरा पिचड एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण

पाथर्डी प्रतिनिधी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील सराटी या ठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसापासून उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून पाथर्डीतील समाजबांधवाकडून शहरातील वसंतराव नाईक चौकात लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. यावेळी सोमनाथ बोरुडे,लक्ष्मण डांगे,रामदास बर्डे,बंडू बोरुडे,देवा पवार,सोमनाथ माने,उद्धव माने,विवेक देशमुख,विष्णुपंत वाखुरे,नांगरे आदी जण यात सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षणावर लवकर निर्णय न घेतल्यास पाथर्डी येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा समाजबांधवानी इशारा पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना शनिवारी निवेदनाद्वारे दिला होता.याच अनुषंगाने आज या सत्याग्रहाला सुरवात झाली असून जोपर्यंत मनोज जरांगे यांचे उपोषण चालू राहील तोपर्यंत पाथर्डीत हा सत्याग्रह चालू राहील अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे.

COMMENTS