Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी

बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका लावल्यानंतर बुधवारी केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मक

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत
7 नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ : आ.आशुतोष काळे
धनलक्ष्मी शाळेत शिवजयंतीनिमित्त दुमदुमला शिवरायांचा जयजयकार

बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका लावल्यानंतर बुधवारी केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान तपास अधिकार्‍यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे. या 7 दिवसांत वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली होती. त्या दिवशी 3 ते 3.15 दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते, अशी माहिती एसआयटी अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाला दिली. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याचेही अनिल गुजर यांनी सांगितले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये 9 डिसेंबरला काय तपास झाला, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याची 10 दिवसांसाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली आहे. यावर न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

COMMENTS