Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रणाली आहेरने मिळवला तृतीय क्रमांक

कोपरगाव शहर ः नुकतेच नाशिक येथे राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या एकदिवसीय इंटेलिजंट ड्रग्स डिलिव्हरी सिस्टीमच्या ओरल प्रेसेंटेशन मध्ये कोपरगाव त

देशहितवादीचे येत्या रविवारी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते प्रकाशन
रेल्वे स्टेशन भागात पुन्हा पोलिस चौक सुरु करावी
 राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

कोपरगाव शहर ः नुकतेच नाशिक येथे राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या एकदिवसीय इंटेलिजंट ड्रग्स डिलिव्हरी सिस्टीमच्या ओरल प्रेसेंटेशन मध्ये कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील प्रणाली अर्जुन आहेर या फार्मसीच्या विद्यार्थिनींनी तृतीय तृतीय क्रमांक मिळवत नाव यशस्वी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवार 7 मार्च रोजी नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून अनेक फार्मसी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला होता. यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील डॉ. कोळपे फार्मसी कॉलेजमध्ये बी फार्मसी च्या दुसर्‍या वर्षाच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणाली अर्जुन आहेर या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत ओरल प्रेझेंटेशन मध्ये तृतीय क्रमांक मिळवला असून या प्रसंगी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, समस्थेची संचालक कमिटी तसेच आयोजकांच्या वतीने प्रणालीचा सन्मानचिन्ह मानपत्र देऊन सन्मान  करण्यात आला असून प्रणालीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS