नवी दिल्ली ः दारू घोटाळाप्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. दिल्लीचे

नवी दिल्ली ः दारू घोटाळाप्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे 247 दिवसांपासून तुरुंगात आहेत. सिसोदिया यांच्यावर दिल्ली दारू निती धोरणात भ्रष्टाचार आणि मनी लॉड्रिंगचे आरोप असून त्यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने 338 कोटी रुपयांची मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय येत असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS