Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सायन-ठाणे प्रवास आता होणार सुस्साट

मुंबई : सायन-ठाणे प्रवास आता सुसाट होणार आहे. येत्या सहा महिन्यात ‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पा’अंतर्गत शीव-ठाण्याला जोडण्यात येणार्‍या मार्गाव

राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचे संकट !
 श्रेयश वराटची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड
हनीट्रॅप ब्लॅकमेलिंग जाळ्यात अडकला क्लासवन अधिकारी ; नगर तालुका पोलिसात दुसरा गुन्हा दाखल, 3 कोटीची मागणी

मुंबई : सायन-ठाणे प्रवास आता सुसाट होणार आहे. येत्या सहा महिन्यात ‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पा’अंतर्गत शीव-ठाण्याला जोडण्यात येणार्‍या मार्गावरील 680 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे. सध्या 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर अखेर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सायन ठाणे प्रवास जलद करण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे 250 कोटी रुपये खर्चाचा ‘छेडानगर वाहतूक सुधार प्रकल्प’ सुरू केला आहे. या अंतर्गत तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे छेडा नगर येथे बांधण्यात येत आहेत.

COMMENTS