Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पॉवर लिफ्टींग स्पर्धेत पोलिस हवालदार अर्चना काळे यांना रौप्यपदक 

अहमदनगर : महिला पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, मास्टर्स इक्युप्ड पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत द्विती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली |
शरणपूर वृद्धाश्रमात आजी-आजोबांना मिष्टान्न भोजन  
प्रभाकर शिरसाठ यांना सहायक फौजदारपदी पदोन्नती

अहमदनगर : महिला पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, मास्टर्स इक्युप्ड पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाऊन रौप्यपदक मिळवले.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, मास्टर्स  I, II, IIⅢ, Ⅳ इक्युप्ड पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा दि.३१ मे ते २ जुन २०२४ रोजी  भोईवाडा कामगार मजदुर संघ मुंबई येथे पार पडल्या.  या स्पर्धेत साधारण १०० ते २०० खेळाडुंनी सहभाग घेतला. अहमदनगर विभाग पोलीस दलातील महिला पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी ५७ किलो वजन गटात नेत्रदिपक कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकाऊन रौप्यपदक मिळविले आहे. तसेच पोलिस हवालदार अरविंद भिंगारदिवे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी कौतुक केले आहे. दोन्ही खेळाडूना “नेस्ट लेव्हल फिटनेस जीमचे संचालक ओंकार गुरव तसेच विजय कन्होजिया , उमेश इंगवले (पती) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

COMMENTS