Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरच्या अभिज्ञा हिस वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक

कोल्हापूर / प्रतिनिधी : इजिप्तपमधील कैरो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील आंतरराष्ट्रीय न

तानाजी विरकर ठरला नागोबा केसरीचा मानकरी; दिल्लीच्या बंटी कुमारला दाखवले आस्मान; शौकिनांची तोबा गर्दी
किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे
पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.

कोल्हापूर / प्रतिनिधी : इजिप्तपमधील कैरो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटीलने सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले.
अभिज्ञा पाटील हिने मनू भाकर (हरियाणा) आणि रिदम सागवान (हरियाणा) यांच्यासमवेत महिला गटातील 25 मीटर स्पोर्टस् पिस्टल प्रकारात 450 पैकी 443 गुणांची कमाई करत रौप्य पदकावर नाव कोरले.
सुवर्ण पदकासाठी झालेल्या लढतीत चेन यान, लियू रुई आणि झाओ जैरूजुआन यांचा समावेश असलेल्या चीनच्या संघाने अभिज्ञा, भाकर व सांगवान यांचा पराभव केला. भारतीय चमूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियनशिप मधले हे अभिज्ञाचे हे दुसरे पदक आहे. सन 2018 मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत अभिज्ञा हिने कांस्य पदकाला गवसणी घातली होती.

COMMENTS